चार वर्षीय गतिमंद मुलाचा बापानेच घोटला गळा

Foto
सावत्र आईच्या मदतीने मृतदेह शेतात फेकून दोघेही पसार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पोटच्या चार वर्षांच्या गतिमंद मुलाचा जन्मदात्या बापानेच सावत्र आईच्या मदतीने गळा घोटून खून केल्याची थरारक घटना समोर आली आहे. क्रूरतेची सीमा गाठणाऱ्या या घटनेत संशयितांनी चिमुरड्याचा मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळून एका नांगरलेल्या शेतात फेकून दिला आणि दोघेही पसार झाले. मंगळवारी (दि. १९) सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे
संतोष सोनाजी डहाळे (३५) आणि त्याची दुसरी पत्नी (रा. मोप, ता. रिसोड, जि. वाशीम, ह.मु. सावित्रीनगर, चिकलठाणा) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. अधिक माहितीनुसार, संतोषची पहिली पत्नी दोन वर्षांपूर्वी त्याच्यापासून विभक्त झाली. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. मृत चार वर्षीय विशेष बालक हे पहिल्या पत्नीचे मुल होते. दरम्यान, संतोष आणि निर्मला हे दोघे महिनाभरापूर्वी त्या मुलाला घेऊन संभाजीनगरात आले. ते सावित्रीनगरात खोली
बोथट वस्तूने मारहाण
मृत बालकाचे घाटी रुग्णालयात शवविच्छेदन झाले. बालकाचे नाक आणि त्याच्या डोक्यावर व पोटावर तोंड दाबून श्वास कोंडण्यात आला. बोथट वस्तूने जबर मारहाण करून त्याला संपवण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले, असे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
आजारपणामुळे ओझे
संतोष आणि निर्मलाने या बालकाला संपवल्याचा आणि आजारपणामुळे त्यांना ते ओझे वाटू लागले होते. गतिमंद असलेल्या बालकांची सततची देखभाल संशय पोलिसांना आहे. अर्थात त्यांना पकडल्यानंतर नेमका प्रकार समोर येईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
भाड्याने घेऊन राहिले. संतोष हा जारच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. मात्र, त्याने ते कामही सोडले होते. तसेच तो कधी यायचा आणि कधी जायचा? याबाबतही शेजाऱ्यांना कधी समजले नाही, अशी माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
फोटोच्या आधारे उपनिरीक्षक विष्णू मृतदेहाचे वर्णन आणि मुंढे, अंमलदार संजय नंद आणि इतरांनी आजूबाजूच्या परिसरात
मृत बालकाबाबत माहिती घेतली. तेव्हा हे बालक महिनाभरापूर्वीच चिकलठाण्यातील सावित्रीनगरात राहायला आलेल्या एका दाम्पत्याचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलीस लगेचच सावित्रीनगरात गेले. मात्र, त्यांच्या खोलीला कुलूप होते. ते दोघेही पसार झाल्याचे स्पष्ट होताच गुन्हे शाखचे एक पथक त्यांच्या मूळ गावी रिसोड येथे खाना झाले, असे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी स्पष्ट केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions